शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत लवकरच निर्णय : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 01:09 AM2021-01-25T01:09:57+5:302021-01-25T01:11:04+5:30

नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. 

Soon decision regarding Shivjanmotsav ceremony: | शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत लवकरच निर्णय : भुजबळ

शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत लवकरच निर्णय : भुजबळ

Next
ठळक मुद्देपारंपरिक मिरवणुकीबाबत सकारात्मक निर्णयाची विनंती

नाशिक : नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. 
शिवजन्मोत्सवानिमित्त पारंपरिक मिरवणुकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करत परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी आज नाशिकमधील शिवजन्मोत्सव समिती व शहरातील विविध मंडळाच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व मंडळ प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. यावेळी छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समिती, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, भाई समाज मित्र मंडळ, शिकसाई फ्रेंड सर्कल, लष्कर ए शिवबा, अशोकस्तंभ साईबाबा मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, शिवसेना प्रणित अर्जुन क्रीडा मंडळ, आत्मविश्वास व्यायामशाळा, गर्जना युवा प्रतिष्ठान, हिंदूसम्राट मित्र मंडळ, धर्मवीर ग्रुप सिडको, मराठा मित्र मंडळ सातपूर, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पुन्हा कोरोना वाढणार नाही याची काळजी आपण सर्वांना घ्यावी लागणार आहे. त्या अनुषंगाने सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शिवजन्मोत्सव मिरवणुकीबाबत कोरोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.
या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिरवणुकीस परवानगी मिळण्याबाबत अडचणी आहे. त्यामुळे सर्व मंडळांच्या वतीने यंदा १९ फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या नियमांचे पालन करून शासकीय तारखेनुसार जयंती साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली.

Web Title: Soon decision regarding Shivjanmotsav ceremony:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.