पित्याकडून झालेल्या अपघातात मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:36 IST2020-02-28T23:35:54+5:302020-02-28T23:36:51+5:30

पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका दरम्यान झालेल्या अपघातात ट्रक चालकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ट्रकचालकाने स्वत: म्हसरूळ पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Son killed in father's accident | पित्याकडून झालेल्या अपघातात मुलगा ठार

पित्याकडून झालेल्या अपघातात मुलगा ठार

पंचवटी : पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका दरम्यान झालेल्या अपघातात ट्रक चालकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ट्रकचालकाने स्वत: म्हसरूळ पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुजरात राज्यातील वापी येथे औषधे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यात उभ्या असलेल्या दुसºया ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात लातूरच्या उदगीर येथील नागेश ज्ञानोबा सुकणे (२३) हा युवक ठार झाला आहे. सुकणे हे चालक असून ते गुरुवारी (दि.२७) पहाटे ५ वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एम एस २४ जे ६७६५ घेऊन वापी येथे पेठरोडने जात असताना जकातनाका रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर ते आदळले. त्यात ट्रकमध्ये पुढे बसलेला त्यांचा मुलगा नागेश हा गंभीर जखमी झाला.उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Son killed in father's accident