वाहनचालकांमध्ये समाधान : बांधकाम विभागाकडून तातडीने दखल देवळा-सौंदाणे पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:51 IST2018-04-03T23:51:42+5:302018-04-03T23:51:42+5:30
देवळा : सार्वजनिक बांधकाम विभागाने देवळा-सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) गावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील नवीन पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण केल्यामुळे चैत्र नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगगडावर जाणाऱ्या भाविकांची तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकºयांची सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

वाहनचालकांमध्ये समाधान : बांधकाम विभागाकडून तातडीने दखल देवळा-सौंदाणे पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण
देवळा : सार्वजनिक बांधकाम विभागाने देवळा-सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) गावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील नवीन पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण केल्यामुळे चैत्र नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगगडावर जाणाऱ्या भाविकांची तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकºयांची सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. पुलालगतच्या परिसरात राहणाºया शेतकºयांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे हे शेतकरी त्रस्त झाले होते. बांधकाम विभागाला या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामाचा मुहूर्त नेमका कधी लागतो याची नागरिकांना प्रतीक्षा होती.