सोसायटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 09:50 PM2020-08-27T21:50:51+5:302020-08-28T00:37:47+5:30

मखमलाबाद : कामावर गैरहजर राहिल्याचा कारणावरून नोकरीतून कमी केलेल्या कर्मचाºयास कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी मातोरी विविध कार्यकारी सोसायटीतील कर्मचाºयाने कुटुंबियां समवेत सोसायटीसमोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे.

Society employees go on hunger strike with their families | सोसायटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण

सोसायटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण

Next
ठळक मुद्देमातोरी : गैरहजर राहिल्याने नोकरीतून कमी केल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
मखमलाबाद : कामावर गैरहजर राहिल्याचा कारणावरून नोकरीतून कमी केलेल्या कर्मचाºयास कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी मातोरी विविध कार्यकारी सोसायटीतील कर्मचाºयाने कुटुंबियां समवेत सोसायटीसमोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे.
मातोरी गावातील सोसायटीत गेल्या ३२ वर्षांपासून क्लार्क पदावर शांताराम तुकाराम वामने हे कार्यरत असून, गेल्या सहा महिन्यापूर्वी ते आजारी असल्याने महिनाभर उपचारासाठी सुट्टी घेतली असता, त्यांच्या गैरहजेरीत चेअरमन आनंद धोंडगे ,तुकाराम पिंगळे ,त्र्यबक कातड यांनी शांताराम यांच्याकडील कारभार काढून घेत आनद शिंदे यांना दिला. कामा वरून कमी केल्याने शांताराम वामने यांनी वारवार विनवणी करून रुजू करण्यासाठी पाठपुरावा केला, परंतु त्यांना रुजू करून घेतले नाही. म्हणून शांताराम वामने यांनी मुलगा व पत्नीसह सोसायटीच्या समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

Web Title: Society employees go on hunger strike with their families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.