येवला इनरव्हील क्लबचे सामाजिक काम कौतुकास्पद : गुजराथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:26+5:302021-08-15T04:16:26+5:30
येवला भेटीत क्लबच्या महिलांसोबत कामकाजाविषयी चर्चा केली, त्यावेळी जिल्हाध्यक्षा गुजराथी बोलत होत्या. जिल्हाउ पाध्यक्ष गिरिशा ठाकरे, बाजार समितीच्या माजी ...

येवला इनरव्हील क्लबचे सामाजिक काम कौतुकास्पद : गुजराथी
येवला भेटीत क्लबच्या महिलांसोबत कामकाजाविषयी चर्चा केली, त्यावेळी जिल्हाध्यक्षा गुजराथी बोलत होत्या. जिल्हाउ पाध्यक्ष गिरिशा ठाकरे, बाजार समितीच्या माजी सभापती उषाताई शिंदे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यानिमित्ताने महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते.
क्लबच्या माजी अध्यक्षा पिनल वर्मा यांनी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती देतांना येवला क्लबने शिक्षणासाठी दोन गरीब विद्यार्थिनींना दत्तक घेतले असून त्यांना शालेय दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास आदी साहित्य वर्षभरासाठी पुरवण्यात येत असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमास इनरव्हिल क्लब अध्यक्षा वसुधा गुजराथी, उपाध्यक्षा भारती पाटील, सचिव जयश्री शहा, माया टोणपे, शितल उदावंत, विजया पाटील, सुशीला गाडे, अनिता पांढरे, संगीता देहाडराय, मीरा तक्ते तसेच माजी अध्यक्षा डॉ. संगीता पटेल, सोनल पटनी, नीलम पटनी, नीता अहुजा, सुनीता गंभीर, गुरुजीत कौर कालडा आदींसह सदस्या उपस्थित होत्या. (१३ येवला ३)
130821\550113nsk_40_13082021_13.jpg
१३ येवला ३