संघटितपणातच सामाजिक सौख्यविजय
By Admin | Updated: July 28, 2015 01:25 IST2015-07-28T01:23:35+5:302015-07-28T01:25:17+5:30
बिरारी : वधू-वर मेळावा कार्यालयाचे उद्घाटन

संघटितपणातच सामाजिक सौख्यविजय
संघटितपणातच सामाजिक सौख्यविजय बिरारी : वधू-वर मेळावा कार्यालयाचे उद्घाटननाशिक : असंघटित समाज घटक संधी उपलब्ध असूनही प्रगती साधू शकत नाही. एकत्रिकरणाच्या प्रक्रियेतून समाजाची जडणघडण होत जाते. संघटितपणातच सामाजिक सौख्य दडलेले आहे. त्यामुळे वधू-वर मेळाव्यासारखे उपक्रम समाजाला एकत्र आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी यांनी कापड बाजारातील विठ्ठल मंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्ट आणि बहुउद्देशिय उत्कर्ष मंडळ, नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ आॅक्टोबरला दादासाहेब गायकवाड सभागृहात शिंपी समाजाचा आंतरराज्य स्तरावरील वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन विजय बिरारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बिरारी बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिकरोडच्या बहुउद्देशिय उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष संजय खैरनार होते. यावेळी विजय बिरारी यांनी वधू-वर पालक परिचय मेळाव्याची उपयुक्ततता स्पष्ट करत त्यातील काही धोक्यांचाही उहापोह केला. अशा मेळाव्यांतून समाजाचे संघटन होण्यास मदत होते, असेही बिरारी यांनी सांगितले. यावेळी मध्यवर्ती कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष डी. व्ही. बिरारी, उपाध्यक्ष रवींद्र बागुल, सुनील निकुंभ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भांडारकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व मेळाव्याचे समन्वयक हेमंत सोनवणी यांनी मेळाव्याची संयुक्त कार्यकारिणी घोषित केली. अध्यक्ष संजय खैरनार यांनी यंदा प्रथमच शहरातील दोन मंडळांनी एकत्र येऊन मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे सांगत मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सहकार्याचे आवाहन केले. प्रास्ताविक विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संदीप खैरनार यांनी, तर सूत्रसंचालन सुनील जगताप आणि प्रवीण देवरे यांनी केले. ट्रस्टचे ज्येष्ठ पदाधिकारी व मेळाव्याचे सेक्रेटरी अमर सोनवणे यांनी आभार मानले. व्यासपीठावर महिला मंडळाच्या पल्लवी कापडणे, सुनंदा बाविस्कर आदि उपस्थित होते.