सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:13 IST2018-10-20T13:13:38+5:302018-10-20T13:13:54+5:30

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव शिवारातील जुन्या दापूर रस्त्यावरील भाटओहोळे परिसरात सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने भामट्याने सासू-सुनेला गंडा घातल्याची घटना घडली.

 Sniffing with gold polishing | सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने गंडा

सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने गंडा

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव शिवारातील जुन्या दापूर रस्त्यावरील भाटओहोळे परिसरात सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने भामट्याने सासू-सुनेला गंडा घातल्याची घटना घडली. भटओहळे परिसरात घरोघरी जावून सोने, चांदीचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगत अनोळखी तरूण फिरत होता. अण्णा काशिनाथ शिंदे यांच्या घरी हा तरूण गेला असता त्याने दागिने पॉलिश करून देतो असे सांगितले. त्यावेळी चंद्रभागा शिंदे व सून अनिता शिंदे या घरी होत्या. चंद्रभागा यांच्या गळ्यातील डोरले, अनिता शिंदे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे वेल, अडीच तोळ्याची पोत, एक तोळ्याची छोटी पोत असे जवळपास पाच तोळ्याचे पॉलिश करण्यासाठी दिले. भामट्यावजवळ असलेल्या डब्यातील पाणी गॅसवर गरम करण्यासाठी सांगून भामट्याने दागिने घेवून नाशिक-पुणे महामार्गाच्या दिशेने फरार झाला.

Web Title:  Sniffing with gold polishing

टॅग्स :Nashikनाशिक