जेलरोडला महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:28 IST2020-07-27T18:28:10+5:302020-07-27T18:28:30+5:30

नाशिक : शहर व परिसरात पुन्हा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहन चोरी , घरफोडीसह आता सोनसाखळी चोरीच्या घटनाही ...

Snatched the gold chain to Jail Road | जेलरोडला महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

संग्रहित छायाचित्र

नाशिक : शहर व परिसरात पुन्हा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहनचोरी, घरफोडीसह आता सोनसाखळी चोरीच्या घटनाही घडू लागल्याने संताप व्यक्त होत आहे. जेलरोडला एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा नाशिकरोड पोलिसांनी दाखल केला आहे.
शोभा राजेंद्र भागवत (५५ रा.जनार्दननगर, नांदूरनाका) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्र र दाखल केली आहे. भागवत या आपल्या मुलींना घेवून जेलरोड येथील एका किराणा दुकानात वस्तू खरेदीसाठी गेल्या असता ही घटना घडली. हरिमन अपार्टमेंट समोरील रस्त्यावर मायलेकी आपली दुचाकी उभी करून दुकानात जाण्याकरिता रस्ता ओलांडत असताना चोरट्यांनी त्यांच्याजवळ दुचाकीने येत पाठीमागे बसलेल्या एका युवकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.

Web Title: Snatched the gold chain to Jail Road