शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

तस्करी रोखली : पेठच्या नदीनाल्यात दडविलेला दीड लाखांचा सागाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 20:19 IST

नाशिक : महाराष्ट्र -गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा, उंबरठाण या वनपरिक्षेत्रांमधील वनसंपदेवर गुजरातस्थित तस्करटोळीने पुन्हा वक्रदृष्टी ...

ठळक मुद्देबुंध्यांवर घडकाम; स्वामीत्वचिन्हांचा आभावसंपुर्ण सागाचा साठा अवैधरित्या वाहून नेला जाणार असल्याची खात्री एकूण ३१ नग जप्त करण्यास पथकांना यश आले आहे

नाशिक : महाराष्ट्र -गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा, उंबरठाण या वनपरिक्षेत्रांमधील वनसंपदेवर गुजरातस्थित तस्करटोळीने पुन्हा वक्रदृष्टी केली आहे. पेठ परिक्षेत्रातील गोंडाळा शिवारात वनविभाग प्रादेशिक व वनविकास महामंडळाने सुमारे १ लाख ५० हजार ७०० रूपये किंमतीचा ३.५ घनमीटर इतका सागवान लाकडाच्या ३१ नगांचा साठा शनिवारी (दि.२१) मध्यरात्रीच्या सुमारास जप्त केला.याबाबत पेठ वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी, वनपरिक्षेत्रात रात्रीच्या गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे प्रादेशिक वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांनी वनपाल, वनरक्षकांच्या पथकासह गोंडाळा शिवार मध्यरात्रीच्या सुमारास गाठले. यावेळी अतिरिक्त कुमक म्हणून तत्काळ झरी व आंबा येथील वनविकास महामंडळाचे वनक्षेत्रपाल प्रशांत जाधव, प्र्रवीण कानाडे यांनी धाव लवाजम्यासह धाव घेतली. गोंडाळा शिवारातील गुजरात सीमेलगत वाहणाऱ्या नार व केंग नदीच्या दुतर्फा वनखात्याच्या पथकाने सुमारे ५००मीटरपर्यंतचा परिसर पायी पिंजून गोंडाळा शिवारातून नदीकाठावर तस्करीच्या हेतूने दडवून ठेवलेले सागाच्या लाकडाचे १४ नग पहिल्यांदा शोधून काढले. त्यानंतर पुढे काही किलोमीटर अंतरावर टोकुर्णा नाल्यातून वनविकास महामंडळाच्या पथकाला १७ नग शोधण्यास यश आले. रात्री दहा वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत वनविभाग प्रादेशिक व वनविकास महामंडळाच्या पथकांची शोधमोहीम सुरू होती. एकूण ३१ नग जप्त करण्यास पथकांना यश आले आहे. सागवान लाकडांचा हा साठा गुजरातकडे वाहून नेला जाणार होता; मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे डाव उधळला गेला.बुंध्यांवर घडकाम; स्वामीत्वचिन्हांचा आभावजप्त करण्यात आलेल्या सर्व सागाच्या लाकडांची पाहणी केली असता काही लाकडे हे ताजे तोडण्यत आलेले आढळून आले तर काही नग हे पंधरवड्यापुर्वी तोडले असल्याचा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. साग वृक्षांचे बुंधे घडकाम करून संपुर्णत: तासून वाहतुकीसाठी सोपे ठरेल, यासाठी लहान-लहान नग तस्करांनी काही स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तयार केल्याचे पंचनाम्यात आढळले. नगावर कोणत्याहीप्रकारचे स्वामित्व चिन्ह नसल्याने हा संपुर्ण सागाचा साठा अवैधरित्या वाहून नेला जाणार असल्याची खात्री वनविभागाच्या पथकाने पटविली असून साठा पेठ येथील आगारात सुरक्षितरित्या आणण्यात आल्याचे मुसळे यांनी सांगितले. सागाची चोरट्या मार्गाने तोड करून तस्करी करणा-यांचा पथकाकडून शोध घेतला जात आहे. अज्ञात तस्करटोळीविरूध्द भारतीय वनअधिनियम १९२७च्या कलम ५२नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी