शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

स्मार्ट फोनने डायऱ्या, कॅलेंडरची बाजारपेठ केली काबीज, मागणी घटली : दैनंदिन कामाचे नियोजन मोबाइलवरच करण्याकडे कल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 4:40 PM

नाशिक : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसागणिक होणाऱ्या क्रांतिकारी बदलांमुळे स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण जगत प्रत्येकाच्या हातात सामावल्याचे पहायला मिळत आहे. हातातल्या स्मार्ट फोनमध्ये रोज घडणाऱ्या घडामोडींसह वार्षिक कार्यक्रमांचे नियोजन आणि नोंदी ठेवणो शक्य झाले आहे. त्यामुळे तारीख, सण, वार पाहण्यासाठी भिंतीवरच्या कॅलेंडरकडे नजर टाकणारे व रोजच्या घडामोडींच्या नोंदी ठेवणारे ...

ठळक मुद्देस्मार्ट फोनच्या उपयोगितेमुळे डायऱ्यांना मागणी घटलीतारीख, सण, वाराचे नियोजन मोबाईलवर करण्याकडे कल माहिती व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वाढली फोनची उपयोगिता

नाशिक : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसागणिक होणाऱ्या क्रांतिकारी बदलांमुळे स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण जगत प्रत्येकाच्या हातात सामावल्याचे पहायला मिळत आहे. हातातल्या स्मार्ट फोनमध्ये रोज घडणाऱ्या घडामोडींसह वार्षिक कार्यक्रमांचे नियोजन आणि नोंदी ठेवणो शक्य झाले आहे. त्यामुळे तारीख, सण, वार पाहण्यासाठी भिंतीवरच्या कॅलेंडरकडे नजर टाकणारे व रोजच्या घडामोडींच्या नोंदी ठेवणारे अनेकजण त्यांची ही दैनंदिन कामे स्मार्ट फोनवरच करू लागल्याने कॅलेंडर व डायऱ्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.गेल्या काही वर्षात स्मार्ट फोन्सची बाजारपेठ बघता बघता विस्तारली असून ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप आणि चॅटिंगचा पर्याय देणाऱ्या असंख्य सोशल साईट्स स्मार्ट फोनच्या एका क्लिकवर आल्या आहेत. त्याचबरोबर झपाटय़ाने नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, हातातील स्मार्ट फोनमध्ये संगणकाप्रमाणे काम करण्याची क्षमता आली आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज असो वा सणवार असो प्रत्येक गोष्टीचे नियोजन व नोंदी हातातल्या स्मार्ट फोनमध्ये सामावल्या आहेत. त्यामुळे पयार्याने डायऱ्या व कॅलेंडरची गरज कमी झाल्याने त्यांचा ग्राहक वर्गही घटला असून, या डायऱ्या व कॅलेंडरची बाजारपेठ स्मार्ट फोनने काबीज केली आहे. सोशल साईटचा प्रचार होण्यासाठी स्वस्त दराने इंटरनेटची उपलब्धता, कमी किमतीतील अधिक फिचर्स असलेले स्मार्ट फोन, संवाद साधण्यात आलेली गती व विविध मोबाइल अ‍ॅप या कारणांमुळे तरु णाईच नव्हे, तर समाजातील लहान-थोरांसह सर्वच घटक स्मार्ट फोनकडे आकर्षित होत आहेत. ग्राहकवर्गाची वाढलेली गरज हे भारतीय कंपन्यांसह परदेशी कंपन्यांनीही चांगलेच हेरले आहे. त्यामुळे ग्रामीण बाजारपेठ काबीज करण्यासाठी बहुतांश मोबाइल उत्पादक व ऑपरेटर कंपन्यांची चढाओढ लागली. अगदी स्वस्तात मोबाइल आणि हवे तसे इंटरनेट प्लॅन खास तयार केले जात आहे. ग्राहक मिळविण्यासाठी नेटवर्किग कंपन्यांचे जाळेही शहरासह ग्रामीण वाडय़ा-वस्त्यांकडे तयार झाले आहे. केवळ संवादाचे माध्यम नव्हे, तर बहुपयोगी झालेल्या स्मार्ट फोनने कॅलेंडर आणि डाय:यांची गरजच कमी केल्याने पयार्याने बाजारातही या वस्तूंचा ग्राहक कमी झाला आहे. नवीन वर्षाच्या पाश्र्वभूमीवर भेटवस्तू म्हणून दिल्या जाणाऱ्या डायऱ्याना मागणी असली तरी वैयक्तिक वापरासाठी डायऱ्या घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याची प्रतिक्रिया स्टेशनरी विक्रेत्यांकडून व्यक्त होत असून, कॅलेंडरच्या विक्रीतही मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दुकानदारांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :MobileमोबाइलNashikनाशिकMarketबाजार