‘स्मार्ट सिटी’ स्पर्धांचा निकाल घोषित

By Admin | Updated: January 23, 2016 23:21 IST2016-01-23T23:20:43+5:302016-01-23T23:21:12+5:30

उद्या वितरण : महापालिकेकडून आयोजन; आदिती कुलकर्णीला ५० हजारांचे बक्षीस

The 'Smart City' contest announced the results | ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धांचा निकाल घोषित

‘स्मार्ट सिटी’ स्पर्धांचा निकाल घोषित

नाशिक : महापालिकेमार्फत ‘स्मार्ट सिटी’ अभियानात लोकसहभागाकरिता घेतलेल्या विविध स्पर्धांचा निकाल महापौर अशोक मुर्तडक यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला. आॅनलाइन स्मार्ट सूचना व संकल्पना स्पर्धेत ५० हजारांचे प्रथम पारितोषिक आयडिया कॉलेजच्या आदिती रोहन कुलकर्णी हिने पटकावले आहे. येत्या सोमवारी (दि.२५) सकाळी १०.३० वाजता मविप्र संस्थेच्या केबीटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, गंगापूररोड येथे विशेष समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानात लोकसहभागही असावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात आॅनलाइन स्मार्ट सूचना व संकल्पना स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ५० हजारांचे पारितोषिक आयडिया कॉलेजच्या आदिती कुलकर्णी हिने मिळविले. द्वितीय क्रमांकाचे ३० हजारांचे पारितोषिक जितेश कन्सारा याने, तर तृतीय क्रमांकाचे २० हजारांचे पारितोषिक मोहन शिवाजी काळोगे यांना घोषित करण्यात आले. याशिवाय दहा हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके अजय चांडक, ए. एम. गोसावी, शिल्पा धामणे, विशाल सांगळे आणि विशाल बेडीस यांना जाहीर करण्यात आली. व्हिजन स्पर्धेत प्रथम - करण मेहता, द्वितीय- एहसान मुजूमदार आणि तृतीय- हेमंत भालेराव यांना रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली. शालेय स्तरावरही विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात चित्रकला स्पर्धेत तनिष्क चव्हाण, प्रणाली शिंदे, शर्वरी तुपे, गोविंद गौतम, सुमित शेलार, स्नेहल आव्हाड, मानसी वाघ व अबुजर पठाण, वक्तृत्व स्पर्धेत चिन्मय मोघे, सिद्धार्थ तोडके, फरहतजहॉँ जाफर हमाम, पौर्णिमा चंदा, भावेश बोरसे, रूपाली हवालदार, प्रज्वल सूर्यवंशी व किरण खरकाळ, निबंध स्पर्धेत चिन्मय मोघे, दीपक मालंगे, जागृती पवार, वैष्णवी शर्मा, चेता जामदार, शेख बिसवा बिलाल, लिटस जोस, विश्वनाथ यादव, महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धेत योगेंद्र कुलकर्णी, प्राजक्ता म्हस्के, मुक्ता मोहिते, प्रियंका जाधव, सलोनी पूरकर, मनीषा जाधव, प्रिया जैन, कृष्ण लोढा, घोषवाक्य स्पर्धेत सलोनी पूरकर, उमा हिंगमिरे, प्रकाश बागुल, कविता स्पर्धेत मीना गिरबे, योगेश सूर्यवंशी, भारती शिंदे, पुष्पलाता गांगुर्डे, यश भुजबळ आणि रांगोळी स्पर्धेत ऐश्वर्या वडनेरे, दीपक भालेराव, सुवर्णा जोपळे, विजयकुमार दाभाडे, राजेश्वरी चौरे, रिया चौरे, मंगला चौरे, अंकित गिरे यांना पारितोषिक जाहीर झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The 'Smart City' contest announced the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.