स्मार्ट सिटीच्या सायकली पडल्या बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:13 IST2020-05-25T22:18:05+5:302020-05-26T00:13:14+5:30
नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचा शेअर बायसिकलिंग प्रकल्प गुंडाळल्यानंतर आता या सायकली ठिकठिकाणी बेवारस स्थितीत पडलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी तर त्यांचे नुकसानदेखील केले जात आहे. त्यामुळे लक्षावधीची गुंतवणूक अशी वाऱ्यावर सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्मार्ट सिटीच्या सायकली पडल्या बेवारस
नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचा शेअर बायसिकलिंग प्रकल्प गुंडाळल्यानंतर आता या सायकली ठिकठिकाणी बेवारस स्थितीत पडलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी तर त्यांचे नुकसानदेखील केले जात आहे. त्यामुळे लक्षावधीची गुंतवणूक अशी वाऱ्यावर सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुमारे दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प राबविण्यात आला होता. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविताना स्मार्ट सिटी कंपनी किंवा नाशिक महापालिकेला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसला तरी पर्यावरणस्नेही शहर म्हणून त्याचा वापर केला जात होता. कंपनीने सुरुवातीला शंभर सायकलींवरून सुरुवात केली. परंतु नंतर मात्र त्याला प्रतिसाद वाढत गेला. त्यामुळे शहरात सायकलींचे शंभर स्टॅँड आणि एक हजार सायकली आणण्यात आल्या होत्या.
ठेकेदाराने इलेक्ट्रीकल सायकलीदेखील आणल्या होत्या. त्यानंतर गेल्या पावसाळ्यात नागरिकांचा प्रतिसाद कमी झाला आणि प्रकल्पाला घरघर लागली. आता तर हा प्रकल्पच गुंडाळला गेला आहे. स्मार्ट सिटी कंपनीने ठेकाच टर्मिनेट केला आहे आणि आता हा प्रकल्प बंद पडला आहे.
----------------------
नोटिसीकडे दुर्लक्ष
महापालिकेने नोटिसा दिल्यानंतरदेखील संबंधितांनी सायकली गोळा केल्या नाहीच उलटपक्षी आता स्मार्ट सिटी कंपनीवर या सायकली उचलण्याची वेळ आली आहे. या सायकली शहरातील विविध भागात पडून आहेत. काही सायकलींचे सीट गायब तर कुठे चाकेच गायब. काही स्टँडवरून सायकली चोरीस गेल्या आहेत काही ठिकाणी पोलिसांनी रस्ते बंद करताना बॅरिकेड म्हणून त्याचा वापर केला आहे. सायकलींची आणखी दुरवस्था होण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सायकली वाचविण्याची वेळ आली आहे.