शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला कमी प्रमाणात भाजीपाला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:00 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी (दि.४) पूर आला आहे. नाशिकसह मुंबई आणि अन्य परजिल्ह्यांतदेखील पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे.

पंचवटी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी (दि.४) पूर आला आहे. नाशिकसह मुंबई आणि अन्य परजिल्ह्यांतदेखील पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे. मुंबईत व मुंबई उपनगरातदेखील पावसाची धुवाधार सुरू असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई भाजीपाल्याची वाहने पाठविली गेली नाही. त्यामुळे मुंबईत निर्यात केल्या जाणाऱ्या भाजीपाला मालाला ब्रेक लागला होता. मात्र सोमवारी (दि.५) मुंबईला निर्यात केला जाणारा भाजीपाला माल कमी प्रमाणात रवाना झाला.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून रविवारी तब्बल सात ते आठ वर्षांनंतर मुंबईत शेतमालाची वाहने रवाना झाली नाही असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीतून मुंबई आणि गुजरातला दैनंदिन जवळपास २५ चारचाकी वाहने भरून शेतमाल निर्यात केला जातो. पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने नाशिक शहरातील तसेच मुंबईकडे जाणाºया काही महामार्गावरदेखील पाणी साचल्याने रस्ते सर्वच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले होते. त्यामुळे भाजीपाला घेऊन जाणारी वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झालीच नाही. मुंबई वगळता अन्य जिल्ह्यातदेखील शेतमाल रवाना झाला नाही. केवळ गुजरात राज्यात सुमारे ५ ते ६ वाहने पालेभाज्या माल पाठविला असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले.सोमवारी (दि.५) बाजार समितीत फळभाज्यांची पंधरा तर सायंकाळी पालेभाज्यांची पाच टक्के आवक आली होती. पावसामुळे बाजार समितीत दैनंदिन होणाºया लाखो रु पयांच्या आर्थिक उलाढालीवर चांगलाच परिणाम जाणवला असल्याचे नाशिक बाजार समिती सूत्रांनी सांगितले. फळभाज्यांचे बाजारभाव सर्वसाधारण होते, तर सायंकाळी पालेभाज्या मालाचे दर किरकोळ वाढले होते. कोथिंबिरीला शेकडा १२ हजार रु पयेपर्यंत बाजारभाव मिळाला होता. रविवारी झालेल्या पावसामुळे बाजार समिती फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजार समितीत फारशी गर्दी दिसून आली नाही.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसvegetableभाज्याMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी