कांदा दरातील मंदी दूर तेजीच्या वातावरणाने उत्पादक सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:29 IST2020-09-14T23:13:12+5:302020-09-15T01:29:12+5:30

वणी : कांदा दराने सोमवारी (दि. १४) उसळी मारली असून, ३५२० रु पयांचा उच्चतम दर कांद्याला मिळाल्याने उत्पादकांचा उत्साह दुणावला आहे. वणी उपबाजारात आज ३३९ वाहनांमधून ८००० क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्र ीस आणला होता. ३५२० रु पये कमाल २१०० रु पये किमान, तर २८०० रु पये सरासरी प्रतिक्विंटल दराने व्यापारीवर्गाने कांदा खरेदी केला.

The slowdown in onion prices has dampened growers | कांदा दरातील मंदी दूर तेजीच्या वातावरणाने उत्पादक सुखावले

कांदा दरातील मंदी दूर तेजीच्या वातावरणाने उत्पादक सुखावले

ठळक मुद्देआर्थिकरीत्या सुदृढ असलेले निर्यातदार कांदा खरेदीसाठी सरसावले

वणी : कांदा दराने सोमवारी (दि. १४) उसळी मारली असून, ३५२० रु पयांचा उच्चतम दर कांद्याला मिळाल्याने उत्पादकांचा उत्साह दुणावला आहे. वणी उपबाजारात आज ३३९ वाहनांमधून ८००० क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्र ीस आणला होता. ३५२० रु पये कमाल २१०० रु पये किमान, तर २८०० रु पये सरासरी प्रतिक्विंटल दराने व्यापारीवर्गाने कांदा खरेदी केला.
कांदा खरेदी-विक्र ीच्या व्यवहार प्रणालीत स्पर्धात्मक वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे उत्पादकांनाही सक्षम पर्याय उभा राहिला आहे. आर्थिकरीत्या सुदृढ असलेले निर्यातदार कांदा खरेदीसाठी सरसावले आहेत व त्यांना सकारात्मक साथ देण्याची बाजार समितीची भूमिका आहे. कारण उत्पादकांना समाधानकारक दर मिळावा असा प्रामाणिक हेतू बाजार समितीचा यामागे आहे. त्यामुळे उत्पादकही अपेक्षित प्रतिसाद या धोरणात्मक व्यवहार प्रणालीला देत आहेत. त्यामुळे उत्पादकांच्या हिताचे चीज झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
कांद्याला सध्यस्थितीत असलेल्या दराचे सातत्य टिकवून राहण्यासाठी कांदा खरेदीदारांची संख्या वाढविण्याचा सूर उमटतो आहे. कारण स्पर्धात्मक वातावरण व्यवहार प्रणालीत असले तर उत्पादकांना चार पैसे अधिक मिळतील, अशी प्रतिक्रि या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील कांदा उत्पादक देवराम पवार यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान गोल्टी स्वरु पाच्या कांद्यातही तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३१२५ कमाल २१०० किमान तर २५०० रु पये सरासरी प्रति क्विंटल असा दर उत्पादकांना मिळाला आहे. सध्यस्थिती पाहता कांदा दरात काही कालावधीसाठी तेजीचे वातावरण राहण्याचा अंदाज वर्तमान स्थितीमुळे वर्तविण्यात येत आहे.

Web Title: The slowdown in onion prices has dampened growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.