झोपलेल्या युवकाच्या डोक्यात घातला कोयता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:27 IST2019-03-11T01:26:43+5:302019-03-11T01:27:43+5:30

जुन्या भांडणाची कुरापत काढून एका संशयिताने युवकाच्या डोक्यावर तसेच हातांवर कोयत्याने सपासप वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे.

Sleeping young man's head covered | झोपलेल्या युवकाच्या डोक्यात घातला कोयता

झोपलेल्या युवकाच्या डोक्यात घातला कोयता

नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून एका संशयिताने युवकाच्या डोक्यावर तसेच हातांवर कोयत्याने सपासप वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील मधुबन ढाब्याजवळ झालेल्या या हल्ल्यात प्रवीण सुरेश पवार (२२) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. प्रवीणने आडगाव पोलीस ठाण्यात संशयित दीपक सूर्यवंशी याच्या विरोधात (रा. दुर्गानगर) मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. आपसातील वादामुळे संशयित दीपकने शुक्र वारी (दि.८) सकाळी अकराच्या सुमारास झोपलेल्या प्रवीणच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली.

Web Title: Sleeping young man's head covered