शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये दिवसभरात सहा साप रेस्क्यू; वातावरण बदलामुळे सापांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 15:28 IST

नाशिक : वातावरण बदलामुळे शहरात सापांचा सुळसुळाट वाढला असून, दिवसभरात इको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू करण्यात आले. गरवारे पॉइंटवरील एका इमारतीच्या आवारातून जाळीमध्ये अडकलेला घोणस जातीचा साप तर इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर एका लॉन्समधून धामण जातीचा सर्प रेस्क्यू या संस्थेच्या सर्पमित्रांकडून करण्यात आला. तसेच उपेंद्रनगरमधील एका बंगल्याच्या पाठीमागे ...

ठळक मुद्देइको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू

नाशिक : वातावरण बदलामुळे शहरात सापांचा सुळसुळाट वाढला असून, दिवसभरात इको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू करण्यात आले. गरवारे पॉइंटवरील एका इमारतीच्या आवारातून जाळीमध्ये अडकलेला घोणस जातीचा साप तर इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर एका लॉन्समधून धामण जातीचा सर्प रेस्क्यू या संस्थेच्या सर्पमित्रांकडून करण्यात आला. तसेच उपेंद्रनगरमधील एका बंगल्याच्या पाठीमागे संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने बसलेली धामण पकडण्यात आली. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील शनिमंदिराच्या परिसरात असलेल्या एका बंगल्यातही धामण निघाल्याची घटना घडली.

त्याचप्रमाणे हिरावाडीमधील तांबोळीनगर परिसरातील एका सदनिकेत घोणस जातीचा अत्यंत विषारी जातीचा साप आढळून आला. एकूणच दिवसभरात सहा ते सात साप रहिवासी परिसरातून वेळीच ‘रेस्क्यू’ करण्यात आले. सध्या घोणस जातीच्या सर्पाचा प्रजनन काळ सुरू असून, थंडीच्या चार महिन्यांपर्यंत हा कालावधी असतो. त्यामुळे घोणस हा सर्प बिळाबाहेर येण्याचे प्रमाण वाढते. तसेच जमिनीमध्ये मुरलेल्या पावसाच्या पाण्याची उन्हाच्या तीव्रतेने वाफ होण्यास सुरुवात झाली असून, जमिनीखाली उष्णता वाढू लागल्याने सर्प या हंगामात बिळ सोडून बाहेर पडतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल