शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

शहरात दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:18 AM

महानगरात बाधितांच्या संख्येने पुन्हा शतकी आकडा ओलांडत १०८पर्यंत मजल मारली. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांचा आकडा थेट १२०९ वर जाऊन पोहोचला आहे. नाशिक महानगरातील बळींमध्ये रविवारी पुन्हा सहा बळींची भर पडली. त्यामुळे शहरातील बळींचा आकडा ६२ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देकोरोना : बाधितांच्या संख्येत दिवसभरात १०८ ने वाढ

नाशिक : महानगरात बाधितांच्या संख्येने पुन्हा शतकी आकडा ओलांडत १०८पर्यंत मजल मारली. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांचा आकडा थेट १२०९ वर जाऊन पोहोचला आहे. नाशिक महानगरातील बळींमध्ये रविवारी पुन्हा सहा बळींची भर पडली. त्यामुळे शहरातील बळींचा आकडा ६२ वर पोहोचला आहे.नाशिक महानगरातील घनदाट लोकवस्ती असलेले जुने नाशिक, पंचवटी, पखालरोड, नाशिकरोड आणि वडाळागाव भागात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. जुने नाशिकमधील बुधवारपेठ, जोगवाडा, पिंजारघाट, कथडा, गंजमाळ, खडकाळी, द्वारका या भागात सातत्याने नवनवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्याचप्रमाणे पंचवटीत पेठराड भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळेच नाशिक महानगरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरहून अधिक आढळण्याची घटना चौथ्यांदा घडली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढू लागल्याचे अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक शहराच्या मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यास रविवारपासून प्रारंभ केला असला तरी त्याचा परिणाम जाणवायला अजून कालावधी जावा लागणार आहे. महापालिकेच्या वतीने अधिकाधिक नागरिकांचा स्वॅब घेऊन संशयितांना पहिल्याच फेजमध्ये शोधून काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जितके अधिक संशयित लवकरात लवकर तपासले जातील, तितके पुढील बाधित आढळण्याचे प्रमाण कमी होणार असल्याने महापालिकेच्या वतीने दिवसभरात किमान पाचशे स्वॅब घेण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. या माध्यमातून अधिकाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग काम वेगात सुरू असले तरी कोरोनाबाधितांचा आकडा आणि मृत्यूदराला रोखण्यात यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसत आहे.दरम्यान, पंचवटीसह नाशिकरोडमध्येदेखील बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने या भागावरदेखील आरोग्य विभागाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.जुने नाशिकची वाढ चिंताजनकमहानगरातील सर्वाधिक वेगवान वाढ ही प्रामुख्याने जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात आहे. मात्र, त्यातही जुने नाशिक आणि वडाळ्यासह पूर्व प्रभागाची वाढ अधिक असल्याने या परिसरावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे धोरण महापालिकेने अवलंबले आहे. या परिसरात जर कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले तर नाशिक महानगरातही प्रसाराचा वेग कमी होऊ शकणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू