तपासणी मोहिमेत सिडकोत सापडले सहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 18:03 IST2020-07-20T18:00:06+5:302020-07-20T18:03:14+5:30

सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ...

Six patients were found in CIDCO during the investigation | तपासणी मोहिमेत सिडकोत सापडले सहा रुग्ण

तपासणी मोहिमेत सिडकोत सापडले सहा रुग्ण

ठळक मुद्देप्रभाग २५ मनपा वैद्यकीय पथक घरोघरी

सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खुटवडनगर ते आयटीआयपूल दरम्यानचा रस्ता तसेच परिसर वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यापाठोपाठ सोमवारी प्रभाग क्रमांक २५मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. या तपासणीत सहाजण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत.
सिडको परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर अनेक उपाययोजना केल्या जात असून, जुन्या सिडकोतील महाराणा प्रताप चौक या भागातील रस्ते चौदा दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर खुटवडनगर परिसर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद केला आहे. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबरच आता नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये परिसरातील संपूर्ण नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत महापालिका प्रशासनातील डॉक्टर तसेच इतर कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी याची सुरुवात पाटीलनगर भागातून करण्यात आली. यावेळी प्रत्येक नागरिकांच्या घरात जाऊन त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यात नागरिकांचे तापमान तसेच आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. तपासणीत सुमारे २५हून अधिक नागरिकांची संशयित कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील सहा रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याने मनपाने त्वरित त्यांना उपचारार्थ हलविले. यावेळी नागरिकांना व्हिटामिनच्या औषधांचे वितरण करण्यात आले. या मोहिमेत मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपिका मोरे, अशोक गायकवाड, अनुजा शेवाळे, डॉ संदीप मंडलेचा, पवन मटाले, गोपी गिलबिले, नीलेश कुलथे आदी सहभागी झाले होते.

:

Web Title: Six patients were found in CIDCO during the investigation