चुलत भावाच्या मारहाणीत बहिणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 00:17 IST2020-04-09T00:15:46+5:302020-04-09T00:17:01+5:30
किरकोळ कारणावरून रविवार कारंजा भागातील गंगावाडीत आपल्या चुलत बहिणीला जबर मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आदळून गंभीर दुखापत होऊन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या चुलत भावाला सरकारवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

चुलत भावाच्या मारहाणीत बहिणीचा मृत्यू
नाशिक : किरकोळ कारणावरून रविवार कारंजा भागातील गंगावाडीत आपल्या चुलत बहिणीला जबर मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आदळून गंभीर दुखापत होऊन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या चुलत भावाला सरकारवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
गच्चीवर असलेल्या प्लायउडवर पाणी का मारले असा जाब विचारत शुक्रवारी (दि.३) रविवार कारंजा येथील गंगावाडीत संशयित दिगंबर चव्हाण याने त्याची चुलत बहीण आश्विनी सतीश चव्हाण (रा. गंगावाडी) हिचे केस धरून गच्चीवर आपटले. या घटनेत तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिगंबर चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.