कोरोना विषाणूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसायात मंदी सिन्नर : पोल्ट्री व्यवसायिकांची आर्थिक सहाय्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 16:01 IST2020-03-10T16:01:19+5:302020-03-10T16:01:37+5:30
सिन्नर: कारोना विषाणूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसायात मोठी मंदी आली असून शासनाने पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक सहाय्यक देण्याची मागणी सिन्नर तालुका पोल्ट्री प्रोडूसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी केली.

कोरोना विषाणूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसायात मंदी सिन्नर : पोल्ट्री व्यवसायिकांची आर्थिक सहाय्याची मागणी
सिन्नर: कारोना विषाणूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसायात मोठी मंदी आली असून शासनाने पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक सहाय्यक देण्याची मागणी सिन्नर तालुका पोल्ट्री प्रोडूसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी केली. याबाबतचे निवदेन आमदार माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले.
सिन्नर तालुका हा पोल्ट्री व्यवसायाचे माहेर घर व पोल्ट्रीतील क्रांतीकारी तालुका म्हणून ओळखला जातो. १९९० च्या दशकात तालुक्यातील शेतकरी हा पोल्ट्री व्यवसायाकडे वळला. सिन्नर हा दुष्काळी तालुका असल्याने कमी पाण्यात चालणारा व्यवसाय म्हणून या व्यवसायाची पाळेमुळे खोलवर रुजली गेली. एक उपजीविकेचे साधन म्हणून याकडे बघितले गेले. मात्र अनेकदा ह्या व्यवसायाला आस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जावे लागले आहे. आज पुन्हा एकदा जगात भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोना या विषाणू मुळे पोल्ट्री शेतकरी देशोधडीला लागला आहे.