सिन्नरला अत्याचार प्रकरणी दोघा विरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 17:53 IST2018-12-11T17:53:45+5:302018-12-11T17:53:58+5:30

सिन्नर : येथील वावीवेस भागात राहणाऱ्या संशयित संतोष दत्तात्रय बनकर याच्याविरोधात बलात्कार केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे.

Sinnar's offense is a crime against the two | सिन्नरला अत्याचार प्रकरणी दोघा विरोधात गुन्हा

सिन्नरला अत्याचार प्रकरणी दोघा विरोधात गुन्हा

सिन्नर : येथील वावीवेस भागात राहणाऱ्या संशयित संतोष दत्तात्रय बनकर याच्याविरोधात बलात्कार केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे. यात संशयिताच्या बहीणीनेही भावासोबत संबंध ठेवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिडीतेच्या घरात घुसून संशयित संतोष ने शरीरसुखाची मागणी केली. त्यास नकार दिल्याने महिलेच्या तोंडास उग्र वासाचा रूमाल लावून बेशुध्द केले व नाशिक येथे बहीणीच्या घरी वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घडलेल्या गुन्ह्याबाबत खंडाळा (सातारा) येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. हा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक आर. बी. लोखंडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sinnar's offense is a crime against the two