सिन्नरला चोरट्यासह  सात दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:22 IST2021-06-30T01:21:30+5:302021-06-30T01:22:24+5:30

सिन्नर तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Sinnar was caught with seven bikes, including a thief | सिन्नरला चोरट्यासह  सात दुचाकी हस्तगत

सिन्नरला चोरट्यासह  सात दुचाकी हस्तगत

सिन्नर : तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सिन्नर शहर आणि तालुक्यात दुचाकी चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दुचाकी चोरांचा छडा लावण्याच्या सूचना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सिन्नर पोलिसांना करण्यात आल्या होत्या. विविध गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी सिन्नर पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू होता.  सिन्नर शहरातील सरदवाडी रोड येथे बायपास पुलाच्या जवळ अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी सरदवाडीकडून सिन्नरकडे पॅशन दुचाकीने (एम. एच. १५, डीए ७९७८) जाणाऱ्या युवकास  थांबवून त्याच्या वाहनाच्या कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. 
त्यास सिन्नर पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली.  त्यात ती दुचाकी ऑक्टोबर २०२० मध्ये सरदवाडीरोड भागातील हॉटेल मिलनबारच्या पाठीमागून चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्हयात संशयित दिनेश विजय बागुल (१९, रा. मापारवाडी, सिन्नर) यास पोलिसांनी  अटक करून त्याच्याकडून आणखी चौकशी केल्यानंतर  चोरीच्या सात दुचाकी काढून दिल्याची माहिती दिली. 
कागदपत्रे नंतर देतो सांगून विक्री
संशयित आरोपी हा दुचाकी चोरल्यानंतर कागदपत्रे नंतर देतो असे सांगून दुचाकी विकत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.  विकलेल्या दुचाकी संशयिताने सिन्नर शहर, माळेगाव एमआयडीसी,  पंचवटी, निमोण ता. संगमनेर, शिर्डी आदी परिसरातून चोरी केल्याबाबत कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Sinnar was caught with seven bikes, including a thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.