बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाची सिन्नरची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:20 IST2019-01-31T18:19:23+5:302019-01-31T18:20:01+5:30

महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाच्या सिन्नर शाखेच्या कार्याध्यक्षपदी दिनकर कलकत्ते, तर सचिवपदी महेंद्र कानडी यांची निवड करण्यात आली.

Sinnar executive committee of Barlutadar Alutered Mahasangh | बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाची सिन्नरची कार्यकारिणी

सिन्नर येथे महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देताना महासंघाचे राज्य संघटक विनायक सुतार. समवेत तालुकाध्यक्ष डॉ. जी.एल. पवार, गणेश देसाई, अनिल काजळे, किशोर निचळ, अनिल कुंभार, दिनकर कलकत्ते, महेंद्र कानडी आदी.

सिन्नर : महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाच्या सिन्नर शाखेच्या कार्याध्यक्षपदी दिनकर कलकत्ते, तर सचिवपदी महेंद्र कानडी यांची निवड करण्यात आली.
येथील शासकीय विश्रामगृहात महासंघाचे राज्य संघटक विनायक सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी महासंघाचे तालुकाध्यक्ष डॉ. जी. एल. पवार, गणेश देसाई, किशोर बोराडे, अनिल काजळे, किशोर निचळ, अनिल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाºयांनी संपर्क अभियान राबवून वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन राज्य संघटक विनायक सुतार यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. पवार यांनी नवीन पदाधिकाºयांची निवड करून त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आली. यामध्ये अशोक सोनवणे (सहसचिव), विजय खर्डे, सुनील दातरंगे, रामकृष्ण जाधव, (उपाध्यक्ष), प्रकाश नन्नावरे (सरचिटणीस), प्रमोद घोलप (खजिनदार), सुरेश दिघे (तालुका संघटक), सुरेश साळी (शहराध्यक्ष), सौ. राधाबाई कुलथे, सौ. अलका काजळे (महिला प्रतिनिधी), श्यामसुंदर झळके (प्रसिद्धीप्रमुख), वसंत अढागळे, चरणदास रामटेके (कार्यकारिणी सदस्य) आदींची निवड करण्यात आली.

Web Title: Sinnar executive committee of Barlutadar Alutered Mahasangh