सिन्नर - निऱ्हाळे बस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:59 IST2020-11-30T22:58:04+5:302020-12-01T00:59:31+5:30

निऱ्हाळे : सिन्नर आगाराची बससेवा सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Sinnar - Demand to start Nirhale bus | सिन्नर - निऱ्हाळे बस सुरू करण्याची मागणी

सिन्नर - निऱ्हाळे बस सुरू करण्याची मागणी

ठळक मुद्देखासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागतो,

निऱ्हाळे : सिन्नर आगाराची बससेवा सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

गेले ८ ते ९ महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली बससेवा सुरू केल्यास औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, व्यापारीवर्ग, शेतकऱ्यांना अनेक कामासाठी सिन्नर, संगमनेर आदी ठिकाणी जावे लागते. परिणामी त्यांना खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागतो, त्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय सहन करावा लागतो. या मार्गावर परिवहन महामंडळाच्या बससेवा सकाळी ९.१५ व सायंकाळी ४.४५ अशा दोन फेऱ्या दिवसातून सुरू कराव्यात, अशी मागणी येथील बाळासाहेब दराडे, शशिकांत केकाणे, अजय थोरात, सरपंच अण्णा काकड, रत्नमाला देशमुख, दत्तू कळसकर, सुभाष यादव आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Sinnar - Demand to start Nirhale bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.