सिन्नरला पट्टीशाळा यात्रोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 17:49 IST2018-12-30T17:49:10+5:302018-12-30T17:49:29+5:30

सिन्नर : येथील गावाबाहेरील देवी मंदिर परिसरातील श्री क्षेत्र पट्टीशाळा येथे श्री चक्रधर स्वामी मंदिराचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Sinnar celebrates the Patshala Yat Festival | सिन्नरला पट्टीशाळा यात्रोत्सव उत्साहात

सिन्नरला पट्टीशाळा यात्रोत्सव उत्साहात

सिन्नर : येथील गावाबाहेरील देवी मंदिर परिसरातील श्री क्षेत्र पट्टीशाळा येथे श्री चक्रधर स्वामी मंदिराचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण करून यात्रेस प्रारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनराध्यक्ष शैलेश नाईक, सर्वज्ञ सेवा मंडळाचे अध्यक्ष विश्वास नागरे, छबू नागरे, मुरलीमल्ल बाबा, कुमार मुनी दादाजी वैरागी, श्रीधर दादाजी सुकेनेकर, निजनमुनी महानुभाव, ऋषीराम पराडेकर, सुदर्शनदादा महानुभाव, सोनाळकर बाबा, छबू नागरे, प्रकाश नन्नावरे, मंदिर व्यवस्थापक अशोक पवार, प्रकाश पवार, सागर पवार आदींसह संत, महंत, तपस्वीनी व सदभक्तीमंडळी उपस्थित होते. पहाटे पाच वाजता देवास मंगलस्नान, सकाळी ७ ते ८ यावेळेत गीता पाठ पारायण करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर सकाळी ९ वाजता पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.

Web Title: Sinnar celebrates the Patshala Yat Festival