सिन्नरला शिवजयंतीचे मोठे कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:25 IST2021-02-19T21:19:42+5:302021-02-20T01:25:57+5:30
सिन्नर: शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण काहीसे वाढत असल्याने शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी सांगितले.

सिन्नरला शिवजयंतीचे मोठे कार्यक्रम रद्द
आडवा फाटा येथे उभारण्यात आलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड आणि माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सर्व मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी ऑनलाईन रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्यास स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे उगले यांनी सांगितले.
यावेळी तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, राजेंद्र जगताप, रवींद्र काकड, राजाराम मुरकुटे, राजाराम मुंगसे, आनंदा सालमुठे, संदीप शेळके, मेघा दराडे, मंगल गोसावी, सरला गायकवाड यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांसह मोजके नागरिक सामाजिक अंतर पाळून व मास्कचा वापर करीत उपस्थित होते.
वावी येथे अभिषेक व महाआरती
सिन्नर तालुक्यातील वावी येथे छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी छत्रपतींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी घोड्यांच्या नृत्यांच्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रेयस माळवे या युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा परिधान केले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, माजी सरपंच विजय काटे, रामनाथ कर्पे, कन्हैयालाल भुतडा, डॉ. कमलाकर कपोते, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नवले, आशिष माळवे, संदीप राजेभोसले, अक्षय खर्डे, संतोष जोशी, विजय सोमाणी, दिलीप वेलजाळी, संजय भोसले, मंदार केसकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.