शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

स्वच्छतागृहातून शिक्षिकेचा व्हिडिओ करणाऱ्यास बेदम चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:07 IST

शहरातील एका महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : शहरातील एका महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूरोडवरील व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात हा प्रकार घडला. संशयित आरोपी अनिल पवार (२५) हा महाविद्यालयातील कंत्राटी सुरक्षारक्षक असून, तो पुरुष स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून महिलांच्या स्वच्छतागृहातील शिक्षिकेचे मोबाइलच्या साह्याने अश्लील चित्रीकरण करीत होता. महाविद्यालयात महिला व पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचे भिंत टाकून विभाजन करण्यात आले आहे. या भिंतीवर पाण्याची टाकी ठेवण्यात आलेली असून, या पाण्याच्या टाकीजवळ बसून संशयित चित्रीकरण करीत असताना त्याचा मोबाइल व्हायब्रेट झाल्याने महिलेला संशय आला. तिने वर पाहिले असता संशयिताचा हात आणि मोबाइल दिसल्यामुळे शिक्षिकेने आरडाओरडा करीत बाहेर पळ काढला. त्यामुळे महाविद्यालयाच्या आवारातील विद्यार्थी आणि शिक्षक काही क्षणांत घटनास्थळाजवळ जमले. याचवेळी चित्रीकरण करणारा कंत्राटी सुरक्षारक्षकही आपल्या बचावासाठी पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराबाबत महाविद्यालय प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे. त्यानुसार संस्थेने सुरक्षेचे कंत्राट अलर्ट सिक्युरिटी फोर्स या एजन्सीला दिले असून, या एजन्सीचा एक सुरक्षारक्षक महिला स्वच्छतागृहात आढळून आला. महाविद्यालयतील काही महिला कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने सुरक्षारक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. बडगुजर यांनी तत्काळ संस्थेच्या पदाधिकाºयांनाही या प्रकाराबाबत अवगत केले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली असून, त्यात सुरक्षारक्षक हा संस्थेचा कर्मचारी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयMobileमोबाइलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी