शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शिवसेनेच्या बंडाविषयी मौन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:43 IST

दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याच्या घोषणेनंतर ‘अच्छे दिन’सारखा हा प्रश्न भाजपची डोकेदुखी ठरला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाच प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरला असताना अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.१७) झालेल्या जाहीरसभेत नवीन गुंतवणूक, एचएचएलच्या प्रश्न असे अनेक विषय हाताळून विरोधकांची तोंडे गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच सभेवरदेखील शिवसेनेचा बहिष्कार असल्याने युतीत जो वाद निर्माण झाला आहे. त्यावर फडणवीस यांनी मात्र सोयीस्कररीत्या मौन पाळले.

ठळक मुद्देदत्तक पित्याचे विरोधकांना प्रत्युत्तर

नाशिक : दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याच्या घोषणेनंतर ‘अच्छे दिन’सारखा हा प्रश्न भाजपची डोकेदुखी ठरला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाच प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरला असताना अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.१७) झालेल्या जाहीरसभेत नवीन गुंतवणूक, एचएचएलच्या प्रश्न असे अनेक विषय हाताळून विरोधकांची तोंडे गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच सभेवरदेखील शिवसेनेचा बहिष्कार असल्याने युतीत जो वाद निर्माण झाला आहे. त्यावर फडणवीस यांनी मात्र सोयीस्कररीत्या मौन पाळले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढू लागला असून टीकाटिप्पणी आणि आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दत्तक पित्याची भूमिका निभावली नसल्याचा आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दत्तक पिता सापत्नपणाची वागणूक देत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.गुरुवारी पंचवटीत गोदाकाठी झालेल्या सभेत फडणवीस यांनी त्याच मुद्द्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटी, सार्वजनिक वाहतूक, हायब्रीट मेट्रो अशा अनेक कामांना त्यांनी उजाळा दिला. अर्थात, असे करताना त्यांनी अनेक अडचणींच्या विषयांना हात घातला नाही. नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पार्किंगचा प्रश्न, बेकायदा धार्मिक स्थळांचा प्रश्न, महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रमांवर आलेले गंडांतर याला त्यांनी स्पर्श केला नाही.निवडणुकीतील जटिल प्रश्न युतीचा होता. शिवसेना भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय नाही. पदाधिकारी आणि नगरसेवकांनी राजीनामे देऊन पश्चिममध्ये पुरस्कृत उमेदवारालाच पाठबळ आहे. परंतु युतीमधील विसंवादावर बोलणे फडणवीस यांनी टाळले.अखेर घोलप आले, पण सोयीसाठी !मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत असतानादेखील शिवसेनेचा बहिष्कार कायम होता. रिपाइं, रासपसह अन्य पक्षांचे पदाधिकारी उपस्थित असताना शिवसेनेचे कोणीच उपस्थित नव्हते. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांचे आगमन झाले. अर्थात, नाशिक तालुक्यातील सिद्धप्रिंप्री येथील मतांच्या ओढीने ते व्यासपीठावर आले, अशी चर्चा होती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा