शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत

By admin | Updated: January 23, 2016 23:10 IST

इच्छुकांचे लॉबिंग : शहराध्यक्षांना डच्चू

नाशिक : शहर व जिल्हा कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिल्यामुळे इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली असून, त्यात आजी-माजी पदाधिकारीही आघाडीवर आहेत. येत्या आठवडाभरात नवीन नियुक्त्या होणार असल्याने हालचाली अधिक गतिमान होऊन एकमेकांवर कुरघोडीचे पूरेपूर प्रयत्न केले जात आहेत. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत फेरबदलाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. पक्ष विरोधी पक्षात असतानाही पाहिजे त्या प्रमाणात विद्यमान पक्ष पदाधिकाऱ्यांकडून सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्यात अपयश येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यातूनच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याचा निष्कर्ष पक्षश्रेष्ठींनी काढला आहे. नाशिक महापालिकेत पक्ष विरोधी पक्षात, तर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आत्तापासून तयारी करण्याचा भाग म्हणूनही या फेरबदलाकडे पाहिले जात आहे. नाशिक शहर कॉँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपद शरद अहेर यांच्याकडे सोपविण्यात आले, नंतर तेच कायम अध्यक्ष राहतील असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे; परंतु ही बाब अन्य इच्छुकांना मान्य नाही. अहेर यांच्या काळात शहराची कार्यकारिणीदेखील होऊ शकलेली नाही, परिणामी कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शैलेश कुटे व शाहू खैरे यांच्या नावांची चर्चा केली जात आहे. त्यात खैरे यांना महापालिकेचे गटनेते पद देण्यात आल्याचा मुद्दा पुढे करून त्यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध झाला, तर कुटे व बच्छाव यांना पक्षाने एकदा संधी दिली असल्याची बाब डॉ. हेमलता पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिली आहे. असे असले तरी कुटे, बच्छाव यांनीही जोरदार लॉबिंग केली आहे. (प्रतिनिधी)