शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:36 IST

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रणालीअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत व्यापारी व काही प्रमाणात शेतक-यांनीही या पद्धतीला विरोध करीत अधिका-यांना घेराव घातला.

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रणालीअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत व्यापारी व काही प्रमाणात शेतक-यांनीही या पद्धतीला विरोध करीत अधिका-यांना घेराव घातला.सकाळी दहा वाजता व्यापारी व काही शेतकºयांच्या उपस्थितीत ई-नाम प्रणाली प्रशिक्षणास पिंपळगाव बाजार समितीच्या सभागृहात प्रारंभ झाला. प्रशिक्षक रंगनाथ कटरे, सभापती आमदार दिलीप बनकर, संचालक सुरेश खोडे, निवृत्ती धनवटे, शंकरलाल ठक्कर, बापूसाहेब पाटील, लक्ष्मण निकम, नारायण पोटे, सचिव संजय पाटील आदींसह पणन विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.प्रशिक्षणादरम्यान कटरे म्हणाले की, ई-नाम प्रणालीनुसार बाजार समितीत शेतमाल विक्र ीसाठी यापुढे शेतकर्यांना आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत शेतकºयांच्याच शेतीमालाचा लिलाव बाजार आवारावर होईल. तसेच शेतमाल खरेदी करणार्या व्यापार्यांना ही नोंदणी आवश्यक असून, नोंदणी केलेले व्यापारीच लिलावात बोली बोलू शकतील. ई-नाम लिलाव पद्धतीनुसार प्रथम शेतकर्यांच्या मालाचा दर्जा ठरवून त्या शेतमालाचा किमान भाव ठरविला जाईल. किमान बाजारभाव ठरल्यानंतरच व्यापाºयांना या शेतमालाची बोली लावता येणार आहे. या पद्धतीतून स्पर्धा होऊन शेतकºयांना चांगला भाव मिळू शकतो. या योजनेद्वारे शेतकर्यांनी आपल्या नावाची नोंदणी एका बाजार समतिीत केली तरी देशभरातील कोणत्याही बाजार समतिीत शेतकरी आपला शेतमाल विक्र ी करू शकतील. तसेच व्यापार्यांनीही आपल्या नावाची नोंदणी केल्यास ते देशातील कोणत्याही बाजार समितीत शेतमाल खरेदी करू शकतील, असे कटरे यांनी स्पष्ट केले.दीड तास चाललेल्या प्रशिक्षण व प्रात्यिक्षकानंतर व्यापारी, शेतकर्यांनी या प्रणालीला कडाडून विरोध केला. या प्रणालीनुसार आम्हास काम करायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत प्रशिक्षक रंगनाथ कटरे यांना घेराव घातला. त्यामुळे केंद्र सरकारचा ई-नामचा फतवा महाराष्ट्रातील बाजार समितीत कार्यान्वित होतो की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.ई-नामबाबत प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक पणन विभागाचे अधिकारी रंगनाथ कटरे या विरोधामुळे हतबल झाले. त्यांनी सर्व प्रकारे व्यापारी व शेतकºयांना या प्रणालीतील फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशेषत: व्यापाºयांनी विरोधाची ठाम भूमिका घेतली. यावेळी बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर उपस्थित होते. त्यांनीही या पद्धतीस विरोध दर्शविला. बाजार समित्या शेतकर्यांसाठी काम करतात. त्यामुळे शेतकºयांनी ही पद्धत स्वीकारली तर आमची हरकत नाही, असेही बनकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिक