कपिलधारा तीर्थ येथे शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:31 IST2021-03-11T20:54:45+5:302021-03-12T00:31:55+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील धार्मिक व पौराणिक महत्त्व असलेल्या कावनई येथील श्रीक्षेत्र कपिलधारा तिर्थ येथे महाशिवरात्रीला संचारबंदी लागू करण्यात आल्याने शुकशुकाट होता.

टाकेद येथील जटायू मंदिर येथे शुकशुकाट.
ठळक मुद्देमंदिरात २०० मीटर अंतर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त
घोटी : इगतपुरी तालुक्यातील धार्मिक व पौराणिक महत्त्व असलेल्या कावनई येथील श्रीक्षेत्र कपिलधारा तिर्थ येथे महाशिवरात्रीला संचारबंदी लागू करण्यात आल्याने शुकशुकाट होता.
कपिलधारा तीर्थ येथे निवडक साधूसंतांच्या उपस्थितीत महाशिवरात्र महापर्वानिमित्त महाभिषेक महंत रामनारायणदास फलहारी बाबा व शिष्यगणांच्या उपस्थितीत पार पडला. मंदिरात २०० मीटर अंतर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, टाकेद येथे महाशिवरात्रीची यात्रा यंदा रद्द झाल्याने यात्रेकरू, व्यावसायिक, दुकानदार अशा अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिक, दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.