शाडु मातीच्या गणेश मुर्तीतुन फुलेल रोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:17 IST2018-09-20T13:16:54+5:302018-09-20T13:17:21+5:30
जलप्रदुषण टाळण्यासाठी नदीत अथवा विहीरीत गणेश मुर्तिचे विसर्जन न करता पंचपात्रीतील पाण्यात विसर्जन

शाडु मातीच्या गणेश मुर्तीतुन फुलेल रोपटे
ठळक मुद्दे जलप्रदुषण टाळण्यासाठी नदीत अथवा विहीरीत गणेश मुर्तिचे विसर्जन न करता पंचपात्रीतील पाण्यात विसर्जन
नाशिक : मविप्र समाजाच्या महर्षि शिंदे डीएड कॉलेज मध्ये पर्यावरणाचा वसा घेऊन शाडुमातीच्या गणेशमुर्ती ची स्थापना करण्यात आली. जलप्रदुषण टाळण्यासाठी नदीत अथवा विहीरीत गणेश मुर्तिचे विसर्जन न करता विधीवत पुजा करुन प्राचार्य काळोगे संजय यांचे हस्ते पंचपात्रीतील पाण्यात विसर्जन करण्यात आले.विसर्जना नंतर मुर्तींच्या मातीत रोप लावुन गणरायाची आठवण ताजी ठेवण्याचा प्रयत्न विद्यालयाने केला .या प्रसंगी प्राध्यापक एम. जे. थेटे ,एल. व्ही. मोगल , एस. एस.महाले, के. के. कानवडे , पी. एन.जाधव, व्हि. एच. मोराचे , दिपाली निरगुडे, मधुआहेर, सदूभाऊ आहेर व छात्राध्यापक उपस्थित होते.