लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:30 IST2019-04-13T13:29:22+5:302019-04-13T13:30:31+5:30

लासलगाव : येथील धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्र मांचे प्रसिद्ध प्रमुख केंद्र असलेले, पुरातन वेशीलगतचे श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव ...

Shriram Janmotsav celebrated in Lasalgaon | लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा

लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा

लासलगाव : येथील धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक
कार्यक्र मांचे प्रसिद्ध प्रमुख केंद्र असलेले, पुरातन वेशीलगतचे श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. प्रात: समयी प्रभु श्रीरामचंद्र, सीतामाई आणि श्रीलक्ष्मणाच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला. डॉ. युवराज पाटील, डॉ. रसिका पाटील, कुणाल गवळे, पुजा गवळे, महेश राजगीरे, पुनम राजगीरे, मयुर पाटील, पुनम पाटील, सुदर्शन वाघचौरे, सोनाली वाघचौरे या मान्यवरांच्या हस्ते पुण्य:वाचन, कलशपुजन आणि पाद्यपुजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्य अशोकराव अग्निहोत्री, नंदिकशोर भंडारी, भास्कर जोशी, मयुर भंडारी, ऋषीकेश जोशी, गुरूप्रसाद दिक्षीत, जितेंद्र गुरव यांनी केले. सकाळी किरण बोरसे यांचे श्रीहरि किर्तन झाले. टाळ पखवाज, शंख-घंटा तसेच टाळ्यांच्या गजरात, फुलं-गुलाल उधळत प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव पाटील, डॉ. कैलास पाटील, सुरेश वडनेरे, कवी प्रकाश होळकर, विष्णू निकम, चांगदेवदादा होळकर, कल्याणराव पाटील, संतोष पलोड, अरूण भांबारे, उमेश पाटील, अंतिम सावंत, अ‍ॅड. नरेंद्र राणा, नवनीत पटेल, विशाल पालवे, योगेश पाटील, राजेंद्र कराड, संदिप उगले, शिवाजी हरळे, महाले बाबा, शाम खलसे, प्रमोद पाटील, निवृत्ती विखे, रमाकांत दाभाडे उपस्थित होते. प्रभु श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी दिवसभर मंदिरात भक्तांची रिघ लागत होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून गेले होते.

Web Title: Shriram Janmotsav celebrated in Lasalgaon

टॅग्स :Nashikनाशिक