आडगावला श्री दगडोजी महाराज यात्रोत्सव

By Admin | Updated: January 23, 2016 23:23 IST2016-01-23T23:22:32+5:302016-01-23T23:23:01+5:30

सवाद्य मिरवणूक : विविध धार्मिक कार्यक्रम

Shri Pathojji Maharaj Yatra | आडगावला श्री दगडोजी महाराज यात्रोत्सव

आडगावला श्री दगडोजी महाराज यात्रोत्सव

पंचवटी : आडगाव येथील श्री दगडोजी महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री दगडोजी महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रोत्सवानिमित्ताने श्री दगडोजी महाराज मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक मीना माळोदे यांच्या हस्ते दगडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. शिंदे गल्ली येथून निघालेली मिरवणूक आडगाव मेनरोड, बसस्टॅँड आदि परिसरांतून काढण्यात येऊन श्री दगडोजी महाराज मंदिराजवळ समारोप करण्यात आला. फुलांनी सजविलेल्या चित्ररथात दगडोजी महाराज यांचा चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला होता. आडगावचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या दगडोजी महाराज मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. दगडोजी महाराज यात्रोत्सवानिमित्ताने पूजा साहित्य तसेच विविध खेळणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. श्री दगडोजी महाराज यात्रोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष भिकाजी शिंदे, सुभाष मते, माणिकराव शिंदे, बाळासाहेब लभडे, रामभाऊ जाधव, अंबादास मवाळ, गोरखनाथ माळोदे, दत्तू हळदे आदिंसह यात्रोत्सव समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या यात्रोत्सवानिमित्ताने येत्या मंगळवारी दुपारी आडगाव व्यायामशाळेच्या पटांगणावर कुस्त्यांची दंगल होणार असून, यातील विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे तसेच गुरुवारी लोककलेचा कार्यक्रम होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Shri Pathojji Maharaj Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.