ब्राह्मण गाव येथे श्री गुरुदत्त जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:19 IST2020-12-29T16:15:43+5:302020-12-29T16:19:56+5:30
ब्राह्मणगाव : येथे बाजार पट्टीतील श्रीदत्त मंदिरात व स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीगुरु दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता प्रथम श्री गुरु चरित्र ग्रंथ पारायण समाप्ती करण्यात आली.

श्रीदत्त मंदिरात जयंती निमित्त प्रवचन करतांना ह.भ. प.परिमल जोशी महाराज व उपस्थित भाविक.
ब्राह्मणगाव : येथे बाजार पट्टीतील श्रीदत्त मंदिरात व स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीगुरु दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी आठ वाजता प्रथम श्री गुरु चरित्र ग्रंथ पारायण समाप्ती करण्यात आली.
नऊ वाजता होम प्रज्वलित करण्यात येऊन दहा वाजता ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर ह.भ. प.परिमल महाराज जोशी यांचे जाहीर प्रवचन सम्मपंन झाले. त्यानंतर १२ वाजता श्री गुरुदेव दत्त जय घोषात जन्मोत्सव साजरा होऊन दत्त भक्त मंडळाचे सदस्य भास्कर अहिरे, गणपत अहिरे, यांचे हस्ते महाआरती करण्यात आली. महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीदत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दिवस भक्तांनी मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्त भक्त मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. स्वामी समर्थ सेवा केंद्रात ही दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन केंद्रात ही महिला मंडळातर्फे आरती व प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.