विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:33 IST2018-05-28T00:33:24+5:302018-05-28T00:33:24+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे महाविद्यालय आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडझिरे येथे जिल्हास्तरीय जलसंधारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जलसंधारणासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान, जलसाक्षरता अभियान, पथनाट्य, जल आणि जनजागृती करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे महाविद्यालय आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडझिरे येथे जिल्हास्तरीय जलसंधारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जलसंधारणासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान, जलसाक्षरता अभियान, पथनाट्य, जल आणि जनजागृती करण्यात आली. या शिबिराचे शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस ज्ञानाजी जायभावे, विश्वस्त बाळासाहेब गामणे, संचालक सुदाम नवाळे आदी उपस्थित होते. स्वयंसेवकांना प्रबोधन व्हावे म्हणून वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानमाला, प्रात्यक्षिक आदी घेण्यात आले. तसेच पानी फाउंडेशनचे सदस्य राजेश हिरवे यांनी विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे प्रशिक्षण दिले. तसेच माजी परीक्षण करून मातीतील कर्बाचे प्रमाण कसे ठरवावे याविषयी अशोक बुरुगळे, संदेश करांदे यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर, उपप्राचार्य दिलीप कुटे, प्रदीप गिते, अर्जुन बोडके, जयराम गिते आदी उपस्थित होते. या उपक्रमात प्रा. शरद काकड, प्रा. समीन शेख, प्रा. देवेंद्र देवरे, प्रा. स्नेहल कासार, प्रा. मेघा भामरे, सरपंच आंबादास बोडके, छाया गिते, अर्जुन बोडके, जयराम गिते, सोमनाथ गिते, संदीप नागरे, मयुर वाघ, कल्याण जगताप, सागर वाघ आदी सहभागी झाले होते.