दुकानदारास दमदाटी करून खंडणी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:56 IST2019-04-01T00:56:25+5:302019-04-01T00:56:42+5:30

: एकलहरारोड अरिंगळे मळा येथे किराणा दुकानदारास दमदाटी करत हत्याराचा धाक दाखवून दहशत पसरवत खंडणी घेतल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Shop the shopkeeper recovering the ransom | दुकानदारास दमदाटी करून खंडणी वसूल

दुकानदारास दमदाटी करून खंडणी वसूल

नाशिकरोड : एकलहरारोड अरिंगळे मळा येथे किराणा दुकानदारास दमदाटी करत हत्याराचा धाक दाखवून दहशत पसरवत खंडणी घेतल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकलहरारोड अरिंगळे मळा येथील किराणा व्यावसायिक शिवाजी तुकाराम अरिंगळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अक्षय नाईकवाडे रा. अश्विनी कॉलनी सामनगावरोड, संदीप ऊर्फ हुसळे शिंदे, सचिन बाबर दोघे रा. अरिंगळे मळा हे तिघे जण अरिंगळे यांच्या दुकानात अ‍ॅक्टीवा (एमएच १५, ईएन ३०२८) गाडीवर आले. नाईकवाडे याने अरिंगळे यांना आम्हाला आज पार्टी करायची आहे, तुझ्याकडून दोन हजार रुपये पाहिजे. सर्व धंद्यावाले आम्हाला हप्ता देतात, गजा थोरात पानटपरीवाल्याचे मी कसे हाल केले तुला माहीत नाही का? दोन हजार रुपये दिले नाही तर आमच्याकडे हत्यार असून, तुला गोळ्या घालून ठार मारू असा दम दिला. संशयित शिंदे याने गालात चापट मारून शिवीगाळ केली. तर बाबर याने कमरेत खोचलेला चाकू बाहेर काढून आरडाओरडा करत दहशत निर्माण केल्याने आजूबाजूच्या दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. सर्वजण निघून गेल्याने घाबरलेल्या अरिंगळे यांनी दुकानाच्या गल्ल्यातून १३०० रुपये नाईकवाडे याला देत तू जर पोलिसांकडे गेला, त्यांना सांगितले तर तुझा गेम करतो अशी धमकी दिली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:  Shop the shopkeeper recovering the ransom