शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सणादिवशी सख्ख्या भावांना का संपवलं?; नाशिकमधील दुहेरी हत्या प्रकरणाचे गूढ उकलले, कारण समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:27 IST

ज्या टोळक्याने दोघा भावांना संपवले, त्या मारेकऱ्यांच्या टोळक्यातसुद्धा दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nashik Double Murder Case : रंगपंचमीच्या सणादिवशी नाशिक शहर दुहेरी हत्या प्रकरणाने हादरले होते. दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून पूर्ववैमनस्यातून वचपा काढायचा आणि वर्चस्ववाद टिकवून ठेवण्यासाठी जाधव बंधूंना टोळक्याने संपवले, असं पोलिस तपासात प्रथमदर्शनी समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अवघ्या सहा तासांत या दुहेरी खुनातील पाचही आरोपींना हेरून बेड्या ठोकल्या. 

नाशिक शहर व परिसरात खुनाचे सत्र सुरुच आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी सिडकोमध्ये एकाचा खून झाला. त्या घटनेला पाच दिवस होत नाही तोच पुन्हा रंगपंचमीच्या उत्साहाचा शेवट थेट दुहेरी हत्याकांडाने झाल्याने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडल्याची चर्चा आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. संशयित आरोपी सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे, अविनाश ऊर्फ सोनू उशिरे या हल्लेखोरांनी जाधव बंधूंवर जोरदार हल्ला चढवला. मृत्युमुखी पडलेल्या जाधव बंधूंपैकी उमेश ऊर्फ मन्ना जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते, असेही बोलले जात आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्य व वर्चस्ववादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. ज्या टोळक्याने दोघा भावांना संपविले, त्या मारेकऱ्यांच्या टोळक्यातसुद्धा दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. यामुळे उपनगर पोलिसांपुढे टाकळीरोड, बोधलेनगर, आंबेडकरवाडी, जय भवानी रोड, जेलरोड या भागातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

शेजारी बनले वैरीमुख्य संशयित आरोपी अनिल रेडेकर, सचिन रेडेकर हे मयत जाधव बंधूंच्या शेजारीच राहायला होते. दुहेरी खुनातील हल्लेखोरांमध्ये हे मुख्य संशयित हल्लेखोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यांच्यामध्ये जुने वाद होते. या वादातून व परिसरात कोणाचे वर्चस्व कायम ठेवायचे यावरून हा हल्ला झाला. रंगपंचमी खेळून संशयित रेडेकर हे घरी जात असताना रस्त्यात त्यांचा शाब्दिक वाद जाधव बंधूंसोबत झाला. या वादानंतर टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढविल्याचे समोर आले आहे.

खंडणी मागणीचीही घटनेला किनारदुहेरी खुनाच्या घटनेला वर्चस्ववादासह खंडणी मागणीचीही किनार असल्याचे दिसत आहे. दोघांकडून ५० हजारांचा हप्ता मागितला जात होता. यामुळे जाधव यांच्याविरोधात तक्रार दिल्याने त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच टोळक्यापैकी सागर गरड याच्यावर अमली पदार्थविक्रीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस