शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल लॉज चालकांना धक्का, उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

By संजय पाठक | Updated: December 27, 2023 17:48 IST

या व्यवसायिकांना व्यक्तिगत याचिका दाखल करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळली आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे गंडांतर आहे.

नाशिक-  त्रंबक रस्त्यावर असलेल्या बेकायदा हॉटेल्स आणि विशेषता लॉजिंग मध्ये चालणाऱ्या उद्योगांविषयी उलट सुलट चर्चा होत असतात. या हॉटेल्स आणि लॉजेसला नाशिक महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच एनएमआरडीएने नोटिसा दिल्या होत्या. त्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या या हॉटेल चालकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. या व्यवसायिकांना व्यक्तिगत याचिका दाखल करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळली आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे गंडांतर आहे.

दरम्यान, या हॉटेल चालकांनी बांधकामे नियमित करावी यासाठी देखील उच्च न्यायालयाकडे विनंती केली होती त्यानुसार एन एम आर डी ए च्या वतीने त्यांना एक महिन्याची विशेष सवलत देण्यात येणार असून या कालावधीत बांधकामे नियमित करावीत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त सतीश खडके यांनी दिला आहे.

नाशिक शहराच्या आजूबाजूच्या सुमारे सहा तालुक्यांचा परिसर एनएमआरडीए च्या अखत्यारीत येतो त्यामुळे एनएमआरडीने सध्या बेकायदेशीर बांधकामांना नोटीस देण्याचा धडाका लावला आहे. त्रंबक रोडवर अनेक शैक्षणिक संस्था असून या मार्गवरील हॉटेल आणि लॉजेसचा गैरप्रकारांसाठी उपयोग होतो अशा प्रकारच्या तक्रारी आहेत मध्यंतरी ग्रामीण पोलिसांनी या भागात धडाकेबाज मोहिम राबवली होती.

दरम्यान, आता या हॉटेल आणि लॉजच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महिनाभरापूर्वी नोटीस दिल्यानंतर संबंधितांचे धाबे दणाणले होते. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दिलासा मिळू शकला नाही.

टॅग्स :Nashikनाशिक