सिन्नरला भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:01 IST2019-05-08T16:00:50+5:302019-05-08T16:01:37+5:30
सिन्नर : ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

सिन्नरला भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा
सिन्नर : ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिमेचे सामुदायीक पूजन, महाआरती, शोभायात्रा व महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमांनी परशुराम जयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वेद शास्त्रसंपन्न रामराव हरिदास गुरूजी, डॉ. संजय रत्नाकर, रवींद्र जोशी, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज खेडलेकर, भूषण रत्नाकर, लक्ष्मीकांत वैद्य, दिलीप बिडवई, सुरेश देशपांडे, गोविंद हरिदास, हर्षल मुळे, गणेश मुळे, अनिता व्यवहारे आदि ब्रह्मवृंदाच्या वेदघोषात भगवान परशरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभाकर खेडलेकर, सुहास कुलकर्णी, सुहास देशपांडे, सीताराम मंदिराचे कार्याध्यक्ष राजेंद्र देशपांडे, कार्यवाह चंद्रशेखर कोरडे, अनिल देशपांडे, बंडोपंत मालपाठक, सुशील फडके, शशिकांत मालपाठक, बाळासाहेब भसे आदिंच्या हस्ते आरती व पूजन करून आणि श्रीफळ वाढवून रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. जय परशुराम, जय जय जय जय परशुराम असा जयघोष करत व आरती व भजने म्हणत शंखध्वनीच्या सुरावटीत शहरातील मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली. शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शोभायात्रेत शारदा महिला मंडळाच्या विलासिनी मालपाठक, सुनीता कोरडे, सीमा देशपांडे, लहानबाई देशपांडे, मीना रत्नाकर, कल्पना भणगे, सुमन जोशी, सुनीता देशपांडे, तृप्ती फडके यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. धनंजय मुळे, अमेय भार्गवे, विजय पांडे, हेमंत मालपाठक, अमित भार्गवे यांच्यासह सौरभ खेडलेकर यांच्या अध्यक्षतेखालील युवक मंडळाने सहभाग घेतला. मंगेश मुळे, संतोष कुलकर्णी, जयंत व्यवहारे, भास्कर कुलकर्णी व पुरोहित संघाच्या सदस्यांनी व्यवस्थापन केले.