पिंपळगाव बसवंतजवळ शिवशाही बस कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:27 IST2018-06-05T01:27:31+5:302018-06-05T01:27:31+5:30

नाशिकहून धुळेकडे जाणाऱ्या शिवशाही बसचे (क्र मांक एमएच ०९ ईएम. १२८६) सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंतजवळ शहा पंपासमोरील उड्डाणपुलावर पुढील चाकाचे टायर फुटल्याने चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बस पंधरा फुटांवरून सरळ खाली साइड रोडवर कोसळली.

 Shivshahi bus collapses near Pimpalgaon Baswant | पिंपळगाव बसवंतजवळ शिवशाही बस कोसळली

पिंपळगाव बसवंतजवळ शिवशाही बस कोसळली

पिंपळगाव बसवंत : नाशिकहून धुळेकडे जाणाऱ्या शिवशाही बसचे (क्र मांक एमएच ०९ ईएम. १२८६) सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंतजवळ शहा पंपासमोरील उड्डाणपुलावर पुढील चाकाचे टायर फुटल्याने चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बस पंधरा फुटांवरून सरळ खाली साइड रोडवर कोसळली. यात चालक संजय केंद्रे किरकोळ जखमी झाले. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून, कुणीही जखमी झाले नाही. बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. यात ३ लहान मुलांचा समावेश आहे. बसचे डाव्या बाजूचे पुढील टायर फुटल्याने बस पंधरा फुटावरून खाली कोसळ्यान मागीलही टायरही फुटले. यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक तरुणांनी तत्काळ मदतकार्यासाठी धाव घेतली.

Web Title:  Shivshahi bus collapses near Pimpalgaon Baswant

टॅग्स :Accidentअपघात