शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
4
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
5
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
6
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
7
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
8
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
9
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
11
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
12
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
13
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
14
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
15
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
16
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
17
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
18
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
19
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
20
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने केली स्वबळाची चाचपणी

By admin | Updated: July 25, 2014 00:36 IST

ठाकरेंनी घेतला आढावा : भाजपा मतदारसंघांतही अनेक इच्छुक

नाशिक : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपा आणि सेना स्वबळाची भाषा करीत आहेत आणि तशी चाचपणीही करीत आहेत. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी नाशिक विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सेनेच्या वाटेला असलेल्या विधासभा मतदारसंघांबरोबरच भाजपाच्या मतदारसंघांतील तयारीचा आणि इच्छुकांचाही आढावा घेतला. त्यामुळे महायुतीनेच निवडणुकीला सामोरे जायचे ठरले, तर किमान काही मतदारसंघांमध्ये भाजपा सेनेत अदलाबदल होण्याची
शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेला घवघवीत यश मिळाल्यानंतर विधानसभेसाठी दोन्ही पक्षांची जय्यत तयारी सुरू आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळाच्या चर्चाही सुरू केल्या. त्यामुळे गुरुवारी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्णांतील तब्बल ३५ मतदारसंघांचा आढावा ठाकरे यांनी घेतला. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, रामदास कदम, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी विभागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून चाचपणी केली.
उत्तर महाराष्ट्रात ३५ जागा असून, प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची सभासद नोंदणी झाली. मतदारसंघात गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काय स्थिती होती, गेल्या महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या जागा, मतदान अशी माहिती घेण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत कोण कोण इच्छुक आहेत त्यांची नावे विचारण्यात आली. त्याचबरोबर भाजपाच्या मतदारसंघांत कोण कोण इच्छुक आहेत, तेथे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत याचाही आढावा घेण्यात आला. त्यानुसार अनेक इच्छुकांनी भाजपाच्या ताब्यातील जागा परत घेण्याची मागणी केली आहे. सर्व बाबींची नोंद घेण्यात आल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
एकमत झाले तरच भाजपाकडून जागा घेणार
शिवसेनेने उत्तर महाराष्ट्रातील ३५ मतदारसंघांतीलच इच्छुकांची चाचपणी करून स्वबळाचे संकेत दिले आहेत; परंतु दुसरीकडे युती झाल्यास भाजपाच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागा मिळविण्याचीही तयारी आहे. त्यामुळे सध्या भाजपाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांतील एकापेक्षा अधिक इच्छुकांना उद्धव ठाकरे यांनी, सर्वांनी एकत्र बसून एकच नाव सांगा, अन्यथा तोंडावर पडण्याची वेळ येईल, असे बजावल्याचे वृत्त आहे.