शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

नाशिकमध्ये विनापरवाना चालविल्या जाणा-या टेरेस रेस्टॉरंटप्रकरणी शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:24 IST

विनापरवाना व्यवसाय : सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्याची मागणी

ठळक मुद्देशहरात ठिकठिकाणी तळमजल्यावर आणि इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतपणे हॉटेल्स-रेस्टॉरंट सुरू एकही हॉटेल्सने आग प्रतिबंधक उपाययोजनेसंबंधी परवानगी घेतलेली नाही

नाशिक - लोअर परेलमधील कमला कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने अनधिकृत हॉटेल्सविरोधी धडक मोहीम सुरू केली असताना नाशिक महापालिकेतही प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेने टेरेस रेस्टॉरंटप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्याची मागणी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.मुंबईतील आगीच्या दुर्घटनेत १४ निष्पाप जीवांचे बळी गेले. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता अनधिकृत हॉटेल्सविरोधात कारवाई आरंभली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका निभावणा-या शिवसेनेने शहरातील अनधिकृत हॉटेल्सविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, शहरात ठिकठिकाणी तळमजल्यावर आणि इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतपणे हॉटेल्स-रेस्टॉरंट सुरू आहेत. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा एकही हॉटेल्सने आग प्रतिबंधक उपाययोजनेसंबंधी परवानगी घेतलेली नाही तर नगररचना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा एकाही हॉटेल्सला नगररचना विभागाने परवानगी दिलेली नाही. असे असताना शहरात सर्रासपणे टेरेससह तळमजल्यावर विनापरवाना हॉटेल्स सुरु आहेत. अशा हॉटेल्सला अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली कशी, असा सवालही बोरस्ते यांनी केला आहे. वास्तविक त्या-त्या विभागीय अधिका-यांनीही अशा हॉटेल्सच्या तपासणीबाबत जबाबदारी घेतली पाहिजे. महापालिकेने शहरातील सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करावे आणि मुंबईतील दुर्घटनेचा बोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. एकीकडे शहर स्मार्ट बनविण्याची तयारी चालविली जात असताना अनधिकृतपणे फोफावलेल्या व्यवसायाकडे मात्र डोळेझाक होताना दिसून येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर हुक्का पार्लरही सुरू आहेत. त्यावरही कुठेही कारवाई होताना दिसून येत नसल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले.व्यावसायिक घरपट्टी आकाराशहरातील हॉटेल्सचे सर्वेक्षण करतानाच त्यांच्याकडून होणा-या व्यवसायामुळे अशा हॉटेल्सकडून व्यावसायिक दराने घरपट्टीची आकारणी करावी. जे हॉटेल्स आगप्रतिबंधक उपाययोजना पूर्ण करतील, अशा हॉटेल्सचे वाढीव बांधकाम नियमित करण्यासाठी त्यांना नव्या अनधिकृत बांधकाम धोरणानुसार हॉर्डशिप प्रीमिअमही आकारता येईल. त्यातून महापालिकेला मोठ्या प्रमाणावर महसूलही मिळू शकतो, अशी सूचनाही अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. .

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेना