ओझर येथे शिवसैनिकांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 14:28 IST2019-02-26T14:27:56+5:302019-02-26T14:28:24+5:30
ओझर : भारतीय वायूदलातर्फे पाकिस्तानातील बालाघाट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रूम उध्वस्त करून हजार किलोचा बॉम्ब टाकण्यात आला. यात सुमारे २०० ते ३०० आतंकवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले.

ओझर येथे शिवसैनिकांचा जल्लोष
ओझर : भारतीय वायूदलातर्फे पाकिस्तानातील बालाघाट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रूम उध्वस्त करून हजार किलोचा बॉम्ब टाकण्यात आला. यात सुमारे २०० ते ३०० आतंकवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. भारतीय लष्कराच्या या कारवाईचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. भारतातर्फे करण्यात आलेल्या या हवाई हल्याचा ओझर शहर शिवसेनेतर्फे जल्लोष करण्यात आला. भारत माता की जय,पाकिस्तान मुर्दाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे लोकसभा संघटक प्रदीप अहिरे, उपतालुका प्रमुख प्रकाश महाल, सोसायटीचे सभापती प्रशांत पगार, शहरप्रमुख नितीन काळे, अमित कोळपकर, स्वप्नील कदम, श्रीकांत जाधव, नरेंद्र थोरात, सुनील चौधरी, मनीष छिडवानी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.