सातपूरला शिवपुत्र संभाजीराजे महानाट्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:54+5:302021-02-05T05:39:54+5:30

शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सावरकरनगर येथील जाणता राजा मैदानावर उंच स्तंभावर भगवा ...

Shivputra Sambhaji Raje Mahanatya organized at Satpur | सातपूरला शिवपुत्र संभाजीराजे महानाट्याचे आयोजन

सातपूरला शिवपुत्र संभाजीराजे महानाट्याचे आयोजन

शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सावरकरनगर येथील जाणता राजा मैदानावर उंच स्तंभावर भगवा ध्वज लावण्यात येणार आहे. १८ फेब्रुवारीला रात्री परिसरातील महिलांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा तर शिवजन्मोत्सवच्या दिवशी समितीच्या वतीने शिवपुत्र संभाजीराजे हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. ७२ फूट भव्य रंगमंच, मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत कलाकार, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, घोडे, उंट यांचा वापर, श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य दाखवणारे वैशिष्ट्यपूर्ण महानाट्य सादर करण्यात येणार आहे. समितीच्या वतीने शिवपूजनासाठी यावर्षी संभाजी महाराजांचे शौर्य सांगणारा रामशेज किल्ला या ठिकाणाहून माती आणली जाणार आहे. मागील वर्षी मंडळाने शिवनेरी किल्ल्यावरून माती आणली होती, अशी माहिती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गंगाराम सावळे,कार्याध्यक्ष कांता शेवरे तसेच नितीन निगळ, जीवन रायते आदींनी दिली.

Web Title: Shivputra Sambhaji Raje Mahanatya organized at Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.