शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरी शेतकरी पॅनलला बहुमत

By admin | Updated: February 1, 2016 22:11 IST

मनमाड कृउबा निवडणूूक : नम्रता पॅनलला अवघ्या तीन जागा

मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत शिवनेरी शेतकरी विकास पॅनलने १२ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले, तर प्रतिस्पर्धी नम्रता पॅनलला मात्र अवघ्या तीन जागा जिंकत समाधान मानावे लागले आहे.अठरा जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सोमवारी सकाळी पालिका वाचनालयाच्या इमारतीमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, गंगाधर बिडगर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेरी शेतकरी विकास पॅनलने १२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळवले. या पॅनलचे सोसायटी सर्वसाधारण गटातून अ‍ॅड. गंगाधर बिडगर (१४३), डॉ.मच्छींद्र हाके (१४५), उत्तम व्हर्गळ (१३९), भागीनाथ यमगर (१३२), किशोर लहाने (१३७), सोसायटी इतर मागासवर्ग गटातून भाऊसाहेब जाधव (१४९), विमुक्त जाती गटातून डॉ. संजय सांगळे (१५५), महिला राखीव गटातून मीराबाई गंधाक्षे (१५५), ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून राजू सांगळे (११५), अप्पा कुणगर (१०६), ग्रामपंचायत अनु.जाती गटातून दशरथ लहिरे (१२९), आर्थिक दुर्बल गटातून अशोक पवार (१३३) विजयी झाले.चंद्रकांत गोगड यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलचे सोसायटी गटातून दीपक गोगड (१४१), आनंदा मार्कंड (१४३), महिला राखीव गटातून सुभद्राबाई उगले (१६२) हे तीन उमेदवार विजयी झाले आहे. व्यापारी गटातून कल्याणचंद ललवाणी (१४१), मानकचंद गांधी (१३७) हमाल मापारी गटातून मधुकर उगले (७०) हे विजयी झाले आहेत.(वार्ताहर)निकाल घोषीत होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.बाजार समितिला पुनर्वेभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन संचालक मंडळ प्र्रयत्न करेल अशी ग्वाही पॅनलचे नेते सुहास कांदे,संजय पवार यांनी या वेळी बोलताना दिली.(वार्ताहर)