पिंपळगावात शिवेनेची घरोघर आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:18 IST2020-07-27T16:17:54+5:302020-07-27T16:18:18+5:30
पिंपळगाव बसवंत : दिवसेंदिवस परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील शिवसेनेच्या वतीने घरोघर आरोग्य तपासणी करण्यात आली.

पिंपळगावात शिवेनेची घरोघर आरोग्य तपासणी
पिंपळगाव बसवंत : दिवसेंदिवस परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील शिवसेनेच्या वतीने घरोघर आरोग्य तपासणी करण्यात आली.
आॅक्सिजन प्लस व टेम्परेंचर टेस्ट करून काही शंका आल्यास तात्काळ पुढील उपचार उपलब्ध करून देत आहे. तसेच या रोगांपासून कशी सतर्कता ठेवायची यांची माहिती परिसरात देण्यात माजी सरपंच भास्कर बनकर यांनी दिली. तर शिवसेनेचेकडून कोरोनाचा पादुर्भाव वाढू नये म्हणून पिंपळगाव शहर परिसरात विशेष काळजी घेण्यात आली असून सर्व नागरिकांची घरी जाऊन आरोग्य तपासणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत केली जात आहे. व रोगांची माहिती देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निलेश पाटील, सुजीत मोरे, राजेश पाटील, वैद्यकीय अधिकारी योगेश धनवटे, नितीन बनकर, आशिष बागुल, केशव बनकर, कौस्तुभ तळेकर, माधव बनकर, सुनील बैरागी, सत्यजित मोरे, नाना जाधव, शरद तिडके, डॉ. डी.बी. जाधव, आरोग्य सेविका डॉ. डी. बी. बागुल, डॉ. एस.एस. दुधाळे, डॉ. सविता तागड,दीपक परदेशी, सविता तागड आदी उपस्थित होते.