Shivaji Sonawane as Sarpanch of Dhondveer Nagar | धोंडवीरनगरच्या सरपंचपदी शिवाजी सोनवणे

धोंडवीरनगरच्या सरपंचपदी शिवाजी सोनवणे

ठळक मुद्देबिनविरोध निवड : उपसरपंचपदी संजय पवार

सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगरच्या सरपंचपदी शिवाजी सोनवणे, तर उपसरपंचपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी आर. बी. त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत सरपंचपदासाठी शिवाजी रामकृष्ण सोनवणे यांच्या नावाची सूचना जयश्री सोनवणे यांनी मांडली, तर उपसरपंचपदासाठी संजय दगडू पवार यांच्या नावाची सूचना विश्वास शिंदे यांनी केली. दोन्ही नावांवर एकमत झाल्याने निवडणूक अधिकारी त्रिभुवन यांनी शिवाजी सोनवणे यांची सरपंचपदी, तर संजय पवार यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी जयश्री पवार, विमल पवार, विश्वास सोनवणे, कविता पवार, शारदा पवार, रतन सोनवणे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर रतन पडवळ, सोपान पडवळ, नारायण शिंदे, राजू सोनवणे, मधुकर सोनवणे, अण्णा सोनवणे, सुरेश सोनवणे, दीपक सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, काबू सोनवणे, भारत पवार, दामू पवार, नाना सोनवणे, भारत सोनवणे आदींच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Shivaji Sonawane as Sarpanch of Dhondveer Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.