शिवप्रेमींमध्ये जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:11 IST2020-02-19T23:16:12+5:302020-02-20T00:11:58+5:30
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, नांदगाव आदी ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. देवळ्यात सादर केलेले लेजीम पथक आकर्षण ठरले. उमराणेत कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शिवमुद्रा असलेल्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांनी दुचाकी रॅलीत सहभाग घेतला.

चांदवड नगर परिषदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करताना अनिल कोतवाल, प्रशांत ठाकरे, नगराध्यक्ष रेखा गवळी, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नवनाथ अहेर, जगन्नाथ राऊत आदी.
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, नांदगाव आदी ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. देवळ्यात सादर केलेले लेजीम पथक आकर्षण ठरले. उमराणेत कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शिवमुद्रा असलेल्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांनी दुचाकी रॅलीत सहभाग घेतला.
चांदवड नगर परिषद कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष रेखा गवळी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कांतिलाल बाफना व माधवराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबाबत माहिती दिली, तर बाळासाहेब वाघ यांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, कविता उगले, शालिनी भालेराव, बाळू वाघ, इंदूबाई वाघ, अॅड. नवनाथ आहेर, अशपाक खान, जगन्नाथ राऊत, अल्ताफ तांबोळी, सुनीता पवार, मीनाताई कोतवाल आदी उपस्थित होते.
चांदवड अध्यापक विद्यालय
येथील लीलाबाई दलूभाऊ जैन अध्यापक विद्यालयात प्रारंभी प्रतिमा पूजन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य धनंजय मोरे होते. शिवजयंतीनिमित्त प्रश्नमंजूषा व वर्क्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
प्रश्नमंजूषा स्पर्धेत वैष्णवी कोतवाल प्रथम, किरण घोरतळे द्वितीय, अश्विनी उशीर तृतीय तसेच वर्क्तृत्व स्पर्धेत कोमल सोनवणे प्रथम, पूजा गांगुर्डे द्वितीय, सोनाली साठे व अक्षय जाधव तृतीय क्रमांक मिळवून यशस्वी झाले. सूत्रसंचालन अक्षय जाधव व किरण घोरतळे याने केले.
नेमिनाथ जैन शाळा
येथील नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेत अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जयश्री गोळेचा होत्या. विद्यार्थ्यांनी पोवाडे, शिवरायांची गाणी सादर केली. विद्यार्थ्यांनी शिवरायांची व जिजामातेची वेशभूषा करून भाषणे केली. सूत्रसंचालन किरण कुवर यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून योगेश फुलदेवरे यांनी शिवरायांच्या चरित्राबद्दल माहिती सांगितली.