पिंपळगाव बसवंत परिसरात शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:14 IST2021-02-20T22:49:10+5:302021-02-21T01:14:23+5:30
पिंपळगाव बसवंत : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात व परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

पिंपळगाव बसवंत परिसरात शिवजयंती
पिंपळगाव बसवंत : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात व परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
ठिकठिकाणी दिमाखात फडकणारे भगवे झेंडे आणि ह्यजय भवानी जय शिवाजीह्ण अशा कणखर घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. पिंपळगाव शहरातील निफाड फाटा येथील बसवंत प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आलेली महाराजांची मूर्ती लक्षवेधी ठरली होती. खासदार भारती पवार व आमदार दिलीप बनकर यांनी याठिकाणी पूजन करून महाराजांना वंदन केले.
ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत येथे सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे यांच्या हस्ते पूजन करून महाराजांना मुजरा करण्यात आला. यावेळी सतीश मोरे, उपसरपंच सुहास मोरे, मंदाकिनी बनकर, दिलीप मोरे, भागवत बोरस्ते उपस्थित होते. (२० पिंपळगाव १)